कुण्या एक नदीकाठावर फिरताना लक्षात आल
अरे आपण एकटेच तर नाही ?
या एवढ्या भाउगर्दीत
कुणीच का आपल नाही ?
मग मी विचार करायला लागलो
आपल कोण, परक कोण
आपले कोण मोजता मोजता
कुणीच परक उरल नाही
आई, बाबा, आजोबा, आजी,
बहिण, भाऊ अशी सगळीच नाती
सर्वांच हे विश्व भिन्न
तरीही एकमेकात गुंतत राही
मग थोड्या कक्षा रुन्दावल्या
दूधवाले काका, भाजीवाल्या आजी
शेजारचे नाना अन कोपरावरल्या माई
असे सगळे बघता बघता
डोक तर पार पिंजून जाई
चालताना या कठीण वाटेवर मात्र
यांचाच कायम आधार असतो
कधी पाठीवारची थाप तर कधी काठी
कधी नुसता आशीर्वादही पुरेसा असतो
तरीही मी आपला, गर्दीतही एकटा
स्वतःतच "काहीतरी" शोधत आहे
"ते" म्हणजे काय हे जाणता अजाणता
आपलीच वाट चालत आहे
ही वाट फारच अरुंद
तशी थोड़ी अवघडही आहे
दूरवर कुठेतरी प्रकाश असला
तरी तो असल्याचाही एक दिलासा आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment