एखाद्या वेळी उशीर होतो बोलणी खातो,
कारण न विचारताही "punctual" नाही म्हणतात
अस का होत विचार न करताच
दुसर्यांना दोष देतो .......... खरच चुकत का ?
एखाद्याला गृहीत धरतो
कारण तो आपला असतो
अपेक्षाभंग होतो
विश्वासाला तडा जातो ........... खरच काही चुकत का ?
कुणावर तरी आपण निस्सीम प्रेम करतो
काहीही अपेक्षा न करता, एकतर्फी
जेंव्हा "response" येतो तेंव्हा तिथून निघून गेलेलो असतो
कुणालातरी वाईट वाटता, दुक्ख होत .......... खरच माझ काही चुकत का ?
मग स्वतःवरच प्रेम करतो, स्वतःसाठीच जगतो
स्वतःला सावरता सावरता कुणापासून तरी लांब जातो
हे लक्षात येइपर्यन्त
खूप उशीर झालेला असतो ............ खरच काही चुकत का ?
असे प्रश्न नेहेमीच पडतात
रोजच्या धबडग्यातही रोजच सतावतात
चालायचच अस म्हणून, या प्रश्नानपासून दूर जातो
सोडवायचा प्रयत्नही न करता, तसेच रडत बसतो
काय, इथेतरी नक्की चुकत ना ?
Sunday, December 20, 2009
कुण्या एक नदीकाठावर फिरताना लक्षात आल
अरे आपण एकटेच तर नाही ?
या एवढ्या भाउगर्दीत
कुणीच का आपल नाही ?
मग मी विचार करायला लागलो
आपल कोण, परक कोण
आपले कोण मोजता मोजता
कुणीच परक उरल नाही
आई, बाबा, आजोबा, आजी,
बहिण, भाऊ अशी सगळीच नाती
सर्वांच हे विश्व भिन्न
तरीही एकमेकात गुंतत राही
मग थोड्या कक्षा रुन्दावल्या
दूधवाले काका, भाजीवाल्या आजी
शेजारचे नाना अन कोपरावरल्या माई
असे सगळे बघता बघता
डोक तर पार पिंजून जाई
चालताना या कठीण वाटेवर मात्र
यांचाच कायम आधार असतो
कधी पाठीवारची थाप तर कधी काठी
कधी नुसता आशीर्वादही पुरेसा असतो
तरीही मी आपला, गर्दीतही एकटा
स्वतःतच "काहीतरी" शोधत आहे
"ते" म्हणजे काय हे जाणता अजाणता
आपलीच वाट चालत आहे
ही वाट फारच अरुंद
तशी थोड़ी अवघडही आहे
दूरवर कुठेतरी प्रकाश असला
तरी तो असल्याचाही एक दिलासा आहे
अरे आपण एकटेच तर नाही ?
या एवढ्या भाउगर्दीत
कुणीच का आपल नाही ?
मग मी विचार करायला लागलो
आपल कोण, परक कोण
आपले कोण मोजता मोजता
कुणीच परक उरल नाही
आई, बाबा, आजोबा, आजी,
बहिण, भाऊ अशी सगळीच नाती
सर्वांच हे विश्व भिन्न
तरीही एकमेकात गुंतत राही
मग थोड्या कक्षा रुन्दावल्या
दूधवाले काका, भाजीवाल्या आजी
शेजारचे नाना अन कोपरावरल्या माई
असे सगळे बघता बघता
डोक तर पार पिंजून जाई
चालताना या कठीण वाटेवर मात्र
यांचाच कायम आधार असतो
कधी पाठीवारची थाप तर कधी काठी
कधी नुसता आशीर्वादही पुरेसा असतो
तरीही मी आपला, गर्दीतही एकटा
स्वतःतच "काहीतरी" शोधत आहे
"ते" म्हणजे काय हे जाणता अजाणता
आपलीच वाट चालत आहे
ही वाट फारच अरुंद
तशी थोड़ी अवघडही आहे
दूरवर कुठेतरी प्रकाश असला
तरी तो असल्याचाही एक दिलासा आहे
Subscribe to:
Posts (Atom)